शनिवार, ५ मार्च, २०११

मृत्यू

मृत्यू असते एक झोप,
जीवन-मरणाच्या प्रवासातील जखमांवरील लेप...

मृत्यू असतो एक झटका,
जीवनाच्या पीडांतून  कायमची सुटका...
पण बनवतो तो सदा कुणाला अनाथ, कुणाला विधवा  तर कुणाला पोरका...

मृत्यूनंतर कळतो जीवनाचा अर्थ,
जीवनाच्या गीतेतील उपदेशांचा भावार्थ...

नाही ज्याला कोणी त्याला मृत्यू आपला असतो,
जीवनात सदा रडलेला मरताना मात्र हसतो...

मृत्यू देऊन जातो अखंड शांती,
जीवनातील तेजाचा अपहार केलेली कांती...

तरी मग का पळतात सारे मृत्यू पासून दूर,
गेला कोणी मारून तर का वाटावी हुरहूर...?