शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

शरणागती

मैत्री करण्याचा मजला मज्जाव नाही,
उथळ पाण्याचा मात्र मला सराव नाही… 

ओंजळीत स्वर्ग, द्या मोक्ष कपाळी प्रभाव नाही ,
उगी खुशामत करणे आपला स्वभाव नाही… 

वाजे वीणा सुतकी वारा कसला अभाव नाही,
हे असण्याचा ते नसण्याचा बनाव नाही… 

पाहतो वैखरी भग्न नग्न सारे टिकाव नाही,
अंतरी शरणागती अथवा निभाव नाही…  

चेहरा



बड़ी मुददत के बाद फिर वो चेहरा नजर आया 
हमें देखके न जाने क्यों उसने पर्दा गिराया 

वैसे तो कैद थे हम अपनी पाक वफदारीमें 
क्यों खांक लम्होंकी कस्मोंमे हमकों चुनवाया 

हमनें तो छोड़ दी थी हसरत साकी को पाने की 
न जाने फिर क्यों साकियाँ गिरेबाँ तक आया 

हमतो वैसेही बेदखल थे उनकी अहले सल्तनतसे 
सपना न जाने क्यों उनका हमें अक्सर आया 

उनकी यादें गुलशन है दर्दे सेहरा में
न जाने क्यों फिर एक आंसू उभर आया 

आराधना


कशी करू आराधना, सांग तू दिनकरा 
नाही सीमा या अंधारा, थांग मन पामरा 

तुझा प्रकाश प्रकाश, सारे आभाळ आभाळ 
माझी फाटकी रे झोळी, सारी ओंजळ ओंजळ 

साऱ्या दुनियेचा वाली, वसे कणात कणात 
माझी दृष्टी 'माया'-वेडी, फिरे तनात मनात 

तुझी लागविरे गोडी, व्हावे मन व्याकूळ बावरे 
तुजवीन कोण नको आता, बापा धावरे धावरे 

झालो मध्यान्हीला जागा, मन व्याकूळ व्याकूळ 
देरे अंतरी प्रकाश … क्षितिजावर सांजवेळ … 


भरारी



आम्ही क्षुद्र दगडच राजे ,तव स्पर्शाने मोती होऊ
महासूर्य तुमच्या तेजाने , स्फुल्लींगातुन  ज्योती होऊ…

तशी व्यर्थ खटपट ही अमुची , तव स्फूर्तीने शिखरही गाठू
धन्य असे तुमची ही महती, श्रमबिन्दुंनी सागर रेटू… 

दुमदुमुदे तुमचा हा डंका, दणदणूदे  सगळ्या त्या लंका
अन तुझिया अश्वमेधा मध्ये, होउदे समिधा ह्या रंका…

पाहून तुमची अमूर्त ही शक्ती, उठे उरातून एक ललकारी
दिन रात्र घडो फक्त शिव भक्ती, अन गात्रं गात्रं  घेऊ दे भरारी



अंधार फार झाला

तोडू सारे पाश चला... अंधार फार झाला..
चला विचारू आरश्याला ... अंधार फार झाला..
लावू दिवा दिव्याला, अंधार फार झाला..
शोधू पुन्हा स्वतःला अंधार फार झाला...

आधार


वर्तमान आयुष्यात भविष्याचा विचार करताना मन फारच दमून जातं..

चाचपडत चाचपडत आधारासाठी भूतकाळात डोकावून पहातं..
मग आठवतात त्या आठवणी.. हृदयाच्या तळ्याशी जपून ठेवलेल्या... समुद्राच्या तळाशी शंख शिंपले असतात अगदी तशा..
मग आठवतात त्या आठवणी .. तो हर्ष तो उत्कर्ष तो जिव्हाळा ती आपुलकी .. तोच सहवास हवा हवासा...
मनाच्या कोपर्यातून हळूच वर येतात त्या आठवणी ... समुद्राच्या लाटांसारख्या...
त्याच लाटांच्या मंजुळ सहवासात ... मनाची नौका पुढे जाते...
तेवढ्यात नाव हेलकावे खाते, वर्तमानाच्या अस्तित्वाची जाणीव होते... भविष्याच्या वादळाची चाहूल लागते...
आणि मन तयार होतं वादळाला सामोरं जाण्यासाठी.. परत तो किनारा गाठण्यासाठी ...

हम और आप


हमे मालूम है तुम हो एक नाजूकसा फूल..
हम न करेंगे तुम्हे तोडनेकी भूल
मगर ये न समजना की हम कायर है
क्यों की हम भी भवरो की दुनियांके वो शायर है..
जिनकी शायरी में हर रोज एक नया फूल होता है...

हमें मालूम है..
के तुम हो एक नशा..
दिल्बरोंके दिलकी आशा..
मगर ये न समाजों की हम भी कुछ कम है
क्योंकि हम में भी वोह दम है...
की जाम पे जाम लगाये जाय...

हमें मालूम है तुम एक आस हो
दीवानोके दिल की प्यास हो...
मगर ये ना समज़ना की तुम्हारे न मिलनेसे हम उदास है..
क्योंकि हम भी ऐसे प्यासे है...
जो बरसात की पहली बूँदसे ही अपनी प्यास बूज़ाते है...

हमें मालूम है की तुम आफरीन हो.
आशिकोंके दिलकी मज़बूरी हो..
मगर ए बेखबर तुम भी एक नारी हो
हमारे दिलकी सवारी होके भी ... हमारे बिना तो अधूरी हो..

पैसा


पैसा ऐसा हाती असावा,
पापी दुनयेत मग देव दिसावा...
पैशाविना पहा सगळीकडे,
नाही ईवलासाही विसावा

पैसा असे तेंव्हा मग
संगे असे सारे स्वार्थी जग..
पैसा असे तर भाजी भाकरी..
नसता पैसा जन्माची चाकरी..

षडरीपुनी वेढलेल्या या जगती,
पैसा तरी त्याला कोण मारी,
कलीरुपी या कंसाला,
असेल का कोणी कंसारी...

दीनदयाळ या सुदाम्याची,
भागवण्यास भूक अन तृष्णा,
घे अवतार या पापी जगती,
कृपानिधान हे श्रीकृष्णा....