पैसा ऐसा हाती असावा,
पापी दुनयेत मग देव दिसावा...
पैशाविना पहा सगळीकडे,
नाही ईवलासाही विसावा
पैसा असे तेंव्हा मग
संगे असे सारे स्वार्थी जग..
पैसा असे तर भाजी भाकरी..
नसता पैसा जन्माची चाकरी..
षडरीपुनी वेढलेल्या या जगती,
पैसा तरी त्याला कोण मारी,
कलीरुपी या कंसाला,
असेल का कोणी कंसारी...
दीनदयाळ या सुदाम्याची,
भागवण्यास भूक अन तृष्णा,
घे अवतार या पापी जगती,
कृपानिधान हे श्रीकृष्णा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा