शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

भरारी



आम्ही क्षुद्र दगडच राजे ,तव स्पर्शाने मोती होऊ
महासूर्य तुमच्या तेजाने , स्फुल्लींगातुन  ज्योती होऊ…

तशी व्यर्थ खटपट ही अमुची , तव स्फूर्तीने शिखरही गाठू
धन्य असे तुमची ही महती, श्रमबिन्दुंनी सागर रेटू… 

दुमदुमुदे तुमचा हा डंका, दणदणूदे  सगळ्या त्या लंका
अन तुझिया अश्वमेधा मध्ये, होउदे समिधा ह्या रंका…

पाहून तुमची अमूर्त ही शक्ती, उठे उरातून एक ललकारी
दिन रात्र घडो फक्त शिव भक्ती, अन गात्रं गात्रं  घेऊ दे भरारी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा