मैत्री करण्याचा मजला मज्जाव नाही,
उथळ पाण्याचा मात्र मला सराव नाही…
उथळ पाण्याचा मात्र मला सराव नाही…
ओंजळीत स्वर्ग, द्या मोक्ष कपाळी प्रभाव नाही ,
उगी खुशामत करणे आपला स्वभाव नाही…
उगी खुशामत करणे आपला स्वभाव नाही…
वाजे वीणा सुतकी वारा कसला अभाव नाही,
हे असण्याचा ते नसण्याचा बनाव नाही…
हे असण्याचा ते नसण्याचा बनाव नाही…
पाहतो वैखरी भग्न नग्न सारे टिकाव नाही,
अंतरी शरणागती अथवा निभाव नाही…